राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या बेनामी संपत्ती प्रकरणी भाजपने केली राज्यनाम्याची मागणी

 

अमरावती | राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसून येत असून मुंबईमधील प्लँटची माहिती लपवल्याने त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता भाजपने त्यांना घेरलं आहे. भाजपने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही केली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईमधील प्लँटची माहिती लपवल्याने चांदुरबाजार न्यायालयाने त्यांना 2 महिने सश्रम कारावास 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोषी ठरवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांचा राज्यमंत्री मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.

भाजपा नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची देखील मागणी यावेळी केली. लोकवर्गनीतून निवडणूक लढतो असं बच्चू कडू सांगतात पण त्यांच्याकडे विविध संस्था आहे त्यामुळे यातून त्यांनी बेनामी संपत्ती गोळा केली असा आरोप यावेळी भाजपने करत न्यायालयाने दोषी ठरवलेले मंत्री बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी केली.

Team Global News Marathi: