अमरावतीपाठोपाठ सांगलीमध्येही शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद पेटला

 

सांगली | अमरावतीपाठोपाठ आता सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवण्यावरून राजकारण पेटले असून यांचे पडसाद आता उमटू लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार झाल्यानंतर तो आज रात्रीच जतला बसवण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे विद्यमान आमदार विक्रम सावंत आणि माजी आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.

याच पार्श्वभूमीवर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जतमध्ये पुतळा बसवताना, परवानगीचा विषय का आणला,पुतळा जतला नेण्यास अटकाव का ? असा भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांनी सवाल उपस्थित केला. अखेरीस खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप आणि मिरज तहसीलदार डी सी कुभांर आणि पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवळे त्यांच्यांत बैठक झाली.

या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जतला नेहण्याची परवनगी देण्यात आली. मिरज मधील मूर्तिकार गजानन सलगर यांनी ब्राँझ धातू पासून तयार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जत शहरातील मुख्य चौकात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सदर पुतळा हा अडीच टनाचा असून अश्वारूढ पुतळ्याची उंची साडे दहा फूट व लांबी 12 फूट अशी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार झाला आहे. गजानन सलगर यांनी तीन वर्षांची मेहनत घेऊन तयाक केला. आमच्या तालुक्यातील शेकडो शिवप्रेमी युवक पुतळा घेण्यासाठी आले होते. पण इथं आल्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला अडवलं आणि चर्चा न केल्याशिवाय पुतळा घेऊन जाऊ नका, असं सांगितलं.

Team Global News Marathi: