मंत्री नवाब मलिक अडचणी वाढणार ? समीर वानखेडे यांच्या वडिलांनी टोकावले कोर्टाचे दार

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी थेट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियनवर अनेक गंभर आरोप लगावत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यातच दररोज पत्रकार परिषेद घेऊन नवनवीन खुलासे करताना मलिक दिसून आले होते. त्यातच मलिक सातत्याने आरोप करत असल्याने वानखेडे कुटुंबीयांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी लाटल्याचा आरोप केला आहे.

तसेच वानखेडे कुटुंब मुस्लीम असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. मुंबई क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने छापेमारी केल्यानंतर यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात मलिकांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मात्र दुसरीकडे आता मंत्री नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मुंबई हायकोर्टात अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे.

समीर वानखेडे हे NCB चे झोनल डायरेक्टर म्हणून काम करतात. आर्यन खानसह नवाब मलिकांच्या जावयाच्या केसमधील ते तपास अधिकारी होते. वानखेडे यांचे वकील अर्शद शेख म्हणाले की, वानखेडे कुटुंबाविरुद्ध मलिक फसवणूक करत आहेत. त्यांच्या धर्मावर प्रश्न निर्माण करुन ते हिंदु नाहीत असा दावा करत आहेत. मलिकांच्या आरोपानं मुलगी यास्मीनचं करिअर उद्ध्वस्त होत आहे. ती क्रिमिनर लॉयर आहे ती नार्कोटिक्सची वकिली करत नाही. पूर्वग्रहदोष असल्यानं मलिक वानखेडे कुटुंबाची बदनामी करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

तसेच वानखेडे कुटुंबीताल सदस्यांचे नाव, प्रतिमा, सामाजिक प्रतिष्ठा याला धक्का पोहचवण्याचं काम मलिकांकडून सुरु आहे. नवाब मलिक आणि त्यांच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते आमच्या कुटुंबीयांविरोधात आपत्तीजनक, मानहानी करणारं लिखाण प्रकाशित करत असल्याने त्याच्यावर बंदी आणावी. मलिकांकडून कुटुंबीयांवर करण्यात येणारे आरोप त्रासदायक असून त्यांनी केलेले आरोप सोशल मीडिया आणि अन्य साईटवरुन हटवण्याची मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी याचिकेतून केली आहे.

Team Global News Marathi: