महाराष्ट्र अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ५३ कोटींहून जास्त रकमेच्या व्यवहारांवर आयकर विभागाची बंदी

 

आयकर विभागाने महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा केलेल्या ५३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. नुकत्याच टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये बँक खाती उघडण्यात प्रचंड अनियमितता आढळून आल्यानंतर आयकर विभागाने हे पाऊल उचलले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शनिवारी ही माहिती दिली.

त्यात म्हटले गेले आहे की,’ विभागाने २७ ऑक्टोबर रोजी बँकेच्या मुख्यालयावर आणि अध्यक्ष आणि संचालकांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते.’ अधिकृत निवेदनात कोणत्या संस्थेवर छापा टाकण्यात आला हे उघड झाले नसले तरी सूत्रांनी ती ‘बुलडाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक’ म्हणून ओळखली आहे. कोअर बँकिंग सोल्युशन्स (CBS) वरील बँक डेटाचे विश्लेषण आणि छाप्यांदरम्यान प्रमुख व्यक्तींच्या स्टेटमेंटच्या विश्लेषणादरम्यान, हे उघड झाले होते.

बँक खाती उघडण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली होती,’ असे निवेदनात म्हटले आहे. या शाखेत १२०० हून अधिक बँक खाती पॅनकार्डशिवाय उघडण्यात आली. यापैकी, ७०० हून अधिक अशी खाती ओळखण्यात आली ज्यात खाते उघडल्याच्या सात दिवसांत, विशेषतः ऑगस्ट २०२० ते मे २०२१ दरम्यान ३४.१० कोटींहून जास्त कॅश जमा करण्यात आली.

Team Global News Marathi: