रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित व्हर्जन, पुन्हा पडळकरांनी साधला निशाणा !

सांगली | भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे विविध मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर घणाघाती टीका करत असतात. पवार कुटुंबियांवर करण्यात येणाऱ्या या टीकेमुळे पडळकर नेहमीच चर्चेत असतात. त्यातच आता गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटूंबातील आणखी एका सदस्यावर टीका केली आहे.

आमदार पडळकर यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या कामगिरीवर टीका करतानाच ते शरद पवारांचे सुधारित व्हर्जन असून शरद पवारांप्रमाणेच ते पुढील पिढयांना मातीत घालवतील असा घणाघात केला आहे. पडळकर आज कर्जतच्या दौऱ्यावर होते. श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी तर क्षेय घेण्यात मात्र सर्वात आधी असतात, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

तसेच ‘रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल,’ असा आरोप पडळकरांनी केला आहे. आता पडळकरांनी केलेल्या टीकेला रास्त्रवडीचे नेते काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे,

Team Global News Marathi: