मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० रुग्णवाहिकेची वाटप

नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यासाठी मतदार संघात १०० रुग्णवाहिकेचे डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने वाटण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकेचा पहिला टप्पा म्हणून काल १६ रुग्णवाहिकांचा लोकर्पण सोहळा पार पडला होता. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या १६ रुग्णवाहिकांच्या चाव्या संबंधित मतदारसंघातील आमदार / खासदार तसेच समाजसेवी संस्था अथवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या हाती सुपुर्त करण्यात आल्या होत्या.

कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात देशातील तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला होता. याकाळात कोरोनाची लागण झालेले रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या कोविड समर्पित रुग्णालयांची उभारणी केली. यावेळी शेकडोंच्या संख्येने कोरोनाबाधितांची दैनंदिन वाढ होत असताना त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता नेण्याकरिता रुग्णवाहिकांवर देखील ताण पडल्यामुळे कमतरता जाणवत होती. याची दखल मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी घेत तातडीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने तातडीने ३४ रुग्णवाहिकांचे मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यातील रुग्णांकरिता वाटप करण्यात आले होते.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत तयार झालेला एक सच्चा शिवसैनिक, शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री या संपुर्ण राजकीय प्रवासात सामाजिक मन जाणणारे आणि त्यांच्या वेदनांसाठी सदोदित सजग असलेले निर्मल मन अर्थात एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत यापुढे भविष्यात कुठल्याही परिस्थितीत राज्यभरात कुठेही रुग्णवाहिकांची कमतरता पडू नये यासाठी खारीचा वाटा उचलत या १०० रुग्णवाहिकांच्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे असे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: