मंत्री धनंजय मुंडे यांच्या कामाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी तोंडभरून केले कौतुक |

 

बीड | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचं मत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, बीड जिल्हा आरोग्य विभाग, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना आणि स्वरूप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात ५८५ गरजू दिव्यांग व्यक्तींना सुमारे 25 हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आलं होत.

जन्मजात कर्णबधिर असलेल्या किंवा काही कारणांनी श्रवणशक्ती गमावलेल्या व्यक्तीच्या कानात जेव्हा आपल्या प्रयत्नातून आवाज ऐकू येतो, त्याचे समाधान अन्य कोणत्याही मोठ्या कामापेक्षा श्रेष्ठ ठरते, असं मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यातील वंचित, दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

Team Global News Marathi: