राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समाजसेवा महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न – उदय सामंत

 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समाजसेवा महाविद्यालय ( एम एस डब्ल्यू) सुरू करण्याचा प्रयत्न असून भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसाठी आपण सुसज्ज होणे गरजेचे आहे यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

कोरोना काळात पाच ते साडेपाच लाख कोरोना योद्ध्यांनी नागरिक आणि समाजासाठी काम केले त्यांना सहाय्य करत रुग्णांसाठी देखील उत्कृष्ट काम करणा-या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्यातील युवकाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सत्कार करण्यात आला. कोविड काळात एनएसएस विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांना आरोग्य विभाग, पोलीस आणि शासनास सहकार्य केले असून त्यांचा सत्कार त्यांच्या जिल्हात जाऊन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे असल्याचे मत्री सामंत यांनी सांगितले.

Team Global News Marathi: