रत्नागिरी जिल्ह्याच्या महामार्गावर अनेक अपघात होत असतात त्यासाठी महामार्गावर एक सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असले पाहिजे ही मागणी आमदार झाल्यापासून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांना वेळोवेळी मागणी करत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या स्वभावानुसार सततच्या पाठपुराव्यामुळे आधी असलेल्या युती सरकारच्या काळातही वेळोवेळी विधानभवनात सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय रत्नागिरी जिल्ह्यात तसेच विशेषतः महामार्गावर व्हावे अशी सतत मागणी करत होते.
त्यानंतर आता असलेल्या महा विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असतानाही सतत पाठपुरावा करून महामार्गावर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघा तील राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय होण्याची मागणी केली असताना मुख्यमंत्र्यांनी सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय होण्याच्या दृष्टीने सहमती दर्शवली होती.
मात्र सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय होण्यासाठी लागणारी ५ एकर जागा वाटूळ ह्या येथे बांधकाम विभागाचे ताब्यात असलेल्या त्यासाठी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना अशोकजी चव्हाण ह्यांच्या कडे सतत पत्र व्यवहार व पाठपुरावा करून मा. मंत्री महोदय दालनात बैठक आयोजित करून बांधकाम विभागाचे ताब्यात असलेली जागे पैकी ५ एकर क्षेत्र सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालया साठी देण्याची जोरदार मागणी लावून धरली त्यानुसार त्यावेळी मंत्री महोदयांनी सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सहमती दर्शवली होती
त्यानुसार आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघा तील राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ५ एकर जागा महसूल आणि वनविभागास हस्तांतरीत करण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. त्यामुळे राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागासह आरोग्य, महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या रुग्णालयासाठी गट नं. ८६६ मधील ५ एकर जागा आरोग्य विभागास हस्तांतरित करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ही जागा महसूल व वन विभागास प्रत्यार्पित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आहे.