अमरावतीत विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याचा नवा वाद

 

अमरावती | अमरावतीत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पर्वावर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या ३०० ते ४०० कार्यकर्त्यांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ फूट पुतळा स्थापन केला. सोबत राजापेठ उड्डाणपूल चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नव्याने स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आमदार रवी राणा यांनी अनावरण केले. मात्र यामुळे मोठं वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर मंगळवारी मध्यरात्री ३ वाजता आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विनापरवानगी रातोरात पुतळा स्थापन करण्यात आल्याने महापालिका कारवाई करणार आहे. गुरुवारी रात्री पुतळा हटविण्याची कारवाई केली जाणार होती पण सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती.

या व्हायरल पसोटमध्ये सांगण्यात आले की, महानगरपालिका रात्री महाराजांचा पुतळा जप्त करणार. हे होऊ न द्यायचं असेल तर जास्तीत जास्त मावळ्यांनी रात्री १० वाजता राजापेठ उड्डाण पुलावर हजर राहावे असं आवाहन करण्यात आले आणि हजारो युवक रात्री हजर झाले. त्यामुळे की काय महानगरपालिका प्रशासनाला काहीच करता आलं नसावं..

तर दुसरीकडे मनपा प्रसंगाने सांगितले की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांची प्रतिमा स्थापन करण्यापूर्वी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा लागतो. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पुतळा स्थापन करता येतो. मात्र, राजापेठ उड्डाणपूल येथे पुतळा स्थापन करण्यापूर्वी कोणतीच परवानगी घेण्यात आली नाही.

Team Global News Marathi: