मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार ‘हा’ असा सुरू… ;

 

शेतकरी आत्महत्येवरून उद्धव बाळासाहेब पक्षाने शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. खरीपाचे पीक महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्याने मोठ्या उमेदीने रब्बीचा हंगाम फुलविला आहे. मात्र महावितरण नावाची ‘टोळधाड’ रब्बीचे पीकही उद्ध्वस्त करीत आहे.

राऊत अग्रलेखात म्हणतायत की,सरकार म्हणते, ‘फुकाच्या गप्पा मारीत नाही. वीज बिल थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही.’ महावितरण म्हणते, ‘वीज बिल भरा, नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू.’ मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे,असे म्हणत राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. या कारभाराच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाने जगायचे कसे? नगर जिल्ह्यातील पोपट जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का ?असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. वीज बिलाच्या थकबाकीचे कारण देत महावितरणने पोपट जाधव यांचे वीज कनेक्शन तोडले होते. वीज नसल्याने शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकाचे नुकसान ते पाहू शकले नाहीत. अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि स्वतःला संपवून घेतले. शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत, असे म्हणत राऊत यांनी सरकारला फटकारले आहे.

Team Global News Marathi: