..म्हणनू संजय राठोडांना मंत्रिमंडळात घेतलं, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया

 

शिंदे आणि फडणवीस यांनी शपथ घेऊन 35 हून अधिक दिवस झाले असून अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यात भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या विस्तारावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खातेवाटपातही समसमान वाटा असेल का? असा सवाल केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, आता आम्ही युती म्हणून एकत्र आलो आहोत. संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे.

यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एका माध्यमाशी बोलताना शिंदे यांनी सांगितलं, की मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांना क्लिन चिट दिली होती. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. आणखी कुणाला काही म्हणायचे असेल तर त्यांनी सांगावे, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे.

पोलिसांनी राठोड यांना क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे राठोडांना मंत्रिमंडळात घेतले. जर कुणाच्या काही सुचना असेल तर त्या घेतल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर काही आमदार नाराज असल्याचं समोर येत आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिला. शिंदे म्हणाले, की मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी होणार आहे. त्यामुळे इतरांचा समावेश केला जाईल.

तसेच हे आमचे सरकार लोकाभिमुख आहे. कामातून आम्ही उत्तर देऊ. राज्याला केंद्राचा पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मी धन्यवाद देईल. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारातून संजय शिरसाट यांचं नाव वगळ्यात आलं. यामुळे शिरसाट नाराज असल्याचं समोर येत होतं. यावरही शिंदेंनी उत्तर दिलं.

 

Team Global News Marathi: