…..म्हणून आदित्य ठाकरे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले,

 

मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ५० आमदार गेले आणि शिवसेनेत फूट पडल्याचे निश्चित झाले. पक्षप्रमुख यांच्यावर थेट आरोप न करता निधी वाटपात केलेला दुजाभाव अशी अनेक कारणं आमदारांनी शिंदे गटात सामील होताना दिली. मात्र आता आदित्य ठाकरे पक्ष नसलेला माणूस झाले असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तोफ डागली आहे.

राज्यात सेना सरकार होत त्यावेळी देखील शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडत आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. त्यानंतर देखील मनसेवर जोरदार टीका झाली होती. आदित्य ठाकरे यांनी तर मनसेचा संपलेला पक्ष असा उल्लेख देखील केला होता. मात्र आता मनसेने देखील आपल्या मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक अकाउंटवरून आदित्य ठाकरे देखील आज पक्ष नसलेला माणूस झाले असल्याचे म्हंटले आहे.

काय म्हटलंय मनसेनं पोस्टमध्ये

नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले ! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये ! असे मनसेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच यावेळी शिल्लक सेना नावाचा हॅशटॅग देखील मनसेने वापरला आहे.

Team Global News Marathi: