ऋतु के नाम की मेहंदी रच रही है शायद…, सायली संजीवचा व्हिडिओ होत आहे वायरल

 

अभिनेत्री सायली संजीव आणि IPL च्या यशामध्ये मराठमोळा ऋतुराज गायकवाड यांची केमेस्ट्री सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरताना दिसून येत आहे. त्यात सायली संजीवची पोस्ट पडली रे पडली की, तिच्या कमेंट बॉक्समध्ये एकाच नावाची चर्चा होताना दिसते. ते नाव म्हणजे धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याचं….

 

गेल्या काही दिवसांपासून सायली व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. आता काय तर त्यांच्या लग्नाची चर्चाही सुरू झालीय. या चर्चेला कारण ठरला तो सायलीनं शेअर केलेला एक व्हिडीओ. सायलीने काही वेळापूर्वी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत सायली हातावर मेहंदी काढताना दिसतेय आणि बॅकग्राऊंडला ‘मेहंदी है रचनेवाली’ हे गाणं वाजतंय. सायलीनं हा व्हिडीओ शेअर केला आणि चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर एकापेक्षा एक कमेंट्स केल्या.

गेल्या काही दिवसांपासून सायली संजीव व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने ‘व्वा’ अशी कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटला सायलीने देखील रिप्लाय दिला होता. तिने त्यावर हार्ट इमोजी सेंड केले होते. सायलीचा हा रिप्लाय पाहून दोघांमध्ये मैत्रीपलीकडचे नाते असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा अद्यापही सुरू आहेत.

Team Global News Marathi: