अविनाश भोसले यांच्या घरावर छापेमारी, सीबीआयकडून एक हेलिकॉप्टर जप्त

 

सीबीयाने पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर छापेमारी करत सीबीआयने एक हेलिकॉप्टर जप्त केलं आहे. तब्बल 34 हजार कोटी रुपयांच्या डीएचएफल घोटाळ्यातील रोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. याप्रकरणी पुणे येथील बांधाम व्यावसायिक अविनाश भोसलेयांच्या घरावर छापेमारी करत सीबीआयने ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केलं आहे.

राज्यातील आणि परराज्यातील अनेक नेत्यांनी वापरलेले हेलिकाप्टर सीबीआयने जप्त केलं आहे. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे हे हेलिकाप्टर आहे. तब्बल 34 हजार कोटी रुपयांच्या डीएचएफल घोटाळ्यातील आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. या घोटाळ्यात भोसले यांचा सहभाग आढळल्याने पुण्यातील बाणेर येथून त्यांचं हेलिकॉप्टर जप्त करण्यात आलं आहे. विमानतळावर असलेल्या हँगरप्रमाणे एका मोठ्या हॉलमध्ये हे हेलिकाप्टर दडवून ठेवण्यात आलं होतं. ते सीबीआयने शोधून काढलं.

या घोटाळ्यातून या आरोपींनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता आरोपींनी खरेदी केल्या. सीबीआय घोटाळ्यासंबंधित मालमत्तांचा शोध घेत आहे. या आधी ईडीने भोसले यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयाचा ताबा घेतला आहे. भोसले यांचे हे हेलिकाप्टर ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांना हे हेलिकाप्टर सहज उपलब्ध होत होते. अनेकांनी भोसले यांच्या हेलिकॉप्टरची सेवा घेतली आहे.

‘मी सावध केलेले पण ऐकतील ते संजय राऊत कुठले’

‘मुख्यमंत्री कितीही कर्तबगार असले तरी..’; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

Team Global News Marathi: