‘मी साहेबांचा व्यक्तिगत मोठा फॅन आहे’ भाजपा खासदार राज ठाकरेंचा चाहता

 

शिर्डी | आपल्या रोखठोक भाषणामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तरुणांचे चांगलेच चाहते असून विरोधी पक्षामध्ये सुद्धा त्यांना मानणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. ते जिथे जातात तिथे त्यांच्याभोवती कार्यकर्ते आणि तरुणांचा गराड असतो. आज राज ठाकरे हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी विमानतळावर जाऊन भेट घेतली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कुटुंबीयांसह साईदर्शनला आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शिर्डीला येता आले नव्हते. तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरे हे साईदर्शनला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भाजप खासदार सुजय विखे शिर्डी विमानतळावर पोहोचले आहे. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सुजय विखे पाटील विमानतळावर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या.

मी राज ठाकरे यांचा व्यक्तिगत मोठा फॅन आहे. आजपर्यंत त्यांना भेटलो नाही. त्यामुळे आज भेट घेण्यासाठी आलोय. मनसेच्या स्थानिक नगरसेवकाच्या आग्रहामुळे स्वागताला आलो आहे. मनसे भाजप युती बाबत माझ्या मनातलं माझ्या मनातच ठेवणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली.

Team Global News Marathi: