छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार, व्यापाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर चेंबूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिसात फिर्याद दिली आहे की, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अज्ञात फोन आला होता. ललितकुमार टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. टेकचंदानी यांनी पोलिसांना माहितीनुसार, त्यांनी छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. ज्यात भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते.

व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना धमक्या देणारे व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेज येऊ लागले. ज्यात त्यांना शिवीगाळ सुद्धा घेण्यात आली आहे. यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तू भुजबळ साहेबांना मॅसेज करत तुझ्या घरी येऊन गोळ्या घालतो. आम्ही तुझ्या पाठीशी दुबईची लोक लावीन, भुजबळ साहेबांना मेसेज करणे तुला महागात पडेल, अशा शब्दात टेकचंदानी यांना धमक्या आल्या असल्याची पोलिसांत तक्रारीत आहेत.

Team Global News Marathi: