“मी पुन्हा येईन हे ‘एप्रिल फुल”; संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका

 

देशभरात आज १ एप्रिलनिमित्त ‘एप्रिल फुल’ साजरा केला जात आहे. काहीतरी खोटं-नाटं सांगुन लोक एकमेकांचा एप्रिल फुल करत असतात. याच पार्श्वभुमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रातील भारतीय जनता पक्षानं जनतेचा एप्रिल फुल केल्याचं म्हटलं आहे.”या देशातील जनतेला राजकीय नेते नेहमीच एप्रिल फुल करत असतात”, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?
शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ‘एप्रिल फुल’बाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी “या देशातील जनतेला राजकीय नेते नेहमीच एप्रिल फुल करत असतात. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, सरकारने एप्रिल फुल करून टाकलं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले. जनेच्या प्रशनांच्या बाबतीत, तसंच ते सोडवण्याच्या बाबतीत वर्षोंवर्षे एप्रिल फुल सुरू आहे. आता एप्रिल फुल हा गंमतीचा विषय राहिला नसून जनतेमध्ये हा जगण्या-मरण्याचा विषय ठरत आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल. प्रत्येक सरकारनं, प्रत्येक राजकारणानं जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे. थापा मारणं बंद केलं पाहिजे. फसवा-फसवी बंद केली पाहिजे” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“गंमत ही तेवढ्यापुर्ता ठीक असते. पण ‘अच्छे दीन येणार’ हे एप्रिल फुलच आहे. तुमच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये येतील, लोक वाट पाहताहेत. सात वर्ष एप्रिल फुलच सुरू आहे. दोन कोटी बेरोजगार लोकांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फुलच आहे. पाकव्याप्त काश्मिर हिंदुस्थानात येणार हे एप्रिल फुल आहे. महाराष्ट्रात किंवा देशामध्ये सुडाचं राजकारण आम्ही करत नाही, असं सांगणं हे एप्रिल फुल आहे. अशा अनेक एप्रिल फुलची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तरी महाराष्ट्र पुढे चालला आहे”

शिवसेना आणि भाजपा याच्या नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र आज राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळं यावर आता भाजपा काय उत्तर देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Team Global News Marathi: