“आमचे कुटुंब राजकारणातील असले तरी माझे आजोबा क्रिकेट”- सुप्रिया सुळे

 

नवी दिल्ली: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नियम १९३ अंतर्गत झालेल्या चर्चेत खेळांना प्रोत्साहन देण्याबाबत भूमिका मांडली.यावेळी त्यांनी देशात क्रीडा क्षेत्रात विकास व्हावा, तसेच खेळाडूंना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या यासाठी लोकसभेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राजकीय मतभेदांपासून क्रीडासंघटना दूर ठेवाव्यात याबाबत त्यांनी मुद्दा उपस्थित करत एक आठवणी सांगितली.

आमचे कुटुंब राजकारणातील कुटुंब म्हणून ओळखले जात असले तरी माझे आजोबा सदू शिंदे हे भारतासाठी क्रिकेट खेळत होते.माझ्या सासुबाई शशी भट या भारतासाठी बॅडमिंटन खेळल्या.माझी बहिण नीता पाटील कबड्डी खेळलेली आहे तर माझा मुलगा महाराष्ट्राच्या संघात बास्केटबॉल खेळत आहे. आमच्या कुटुंबात चार वेगळे खेळ अतिशय उत्तमरित्या खेळणारे चार खेळाडू आहेत. या सभागृहात ‘एक जिल्हा, एक खेळ’ असा उल्लेख झाला. जर असं करायचं झालं तर इतर खेळ खेळणाऱ्या उत्तम खेळाडूंचं काय करायचं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान यावेळी त्यांनी त्तम दर्जाची क्रीडा संकुले उभारुन खेळांना प्रोत्साहन देणारे अभ्यासक्रम सुरु करावेत. पायाभूत सुविधांचा विकास करावा, ज्यामुळे अधिकाधिक खेळाडूंना त्याचा फायदा होऊ शकेल. अशी मागणी केंद्राकडे केली. क्रीडासंघटना आणि सरकार यांनी एकत्रितपणे व परस्परपूरक काम केले तर त्याचा फायदा क्रीडाक्षेत्राला होईल.असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: