मी पुन्हा येईन; देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्विट करत मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट

 

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे अशातच शिंदे यांच्या बंडाने नवं वळणं मिळालं आहे. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर अभूतपूर्व सत्तासंघर्ष राज्यात पाहायला मिळाला. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री बनले. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि सर्वाधिक आमदार निवडून आणणाऱ्या भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं.

या घडामोडीमुळे शिवसेना-भाजपात यांच्यात कमालीचं वितुष्ट आले. आता चित्र पालटलं आहे. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला धक्का बसला. भाजपाचं संख्याबळ नसतानाही उमेदवार विजयी झाले. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला हादरा दिला. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. भाजपासोबत सरकार बनवावं अशी आग्रही मागणी या गटाने केली आहे. त्यामुळे भाजपाचं राज्यात पुन्हा सरकार येईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

या सर्व सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासही म्हणून संबोधले जाणारे भाजपा नेते मोहित कंबोज यांची महत्त्वाची भूमिका आहे. सूरत येथे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत कंबोज यांचे फोटो समोर आले. त्यानंतर गुवाहाटीतही मोहित कंबोज या आमदारांसोबत असल्याचं कळतंय. या मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो शेअर करत सूचक ट्विट केले आहे. त्यात फडणवीसांनी विधानसभेत म्हटलेली शायरीचा उल्लेख आहे. फडणवीस म्हणाले होते की, “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना. मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा” असं म्हणाले होते.

 

Team Global News Marathi: