फडणवीसांनी आम्हाला मदत केली तर चुकीचं काय?, केसरकर यांचा सूचक विधान

 

शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटाला भाजप नेत्यांची मदत असल्याचा आरोप शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत आहेत. मात्र, शिंदे गटाकडून अद्यापही याबाबत स्षष्टपणे सांगण्यात आले नाही. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे गटाला राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचाच पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. तसेच संजय राऊत हे थेटपणे भाजपवर आरोप करत आहेत. मात्र, भाजपनेही अद्याप याबाबत स्पष्टता दिली नाही. आता, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी फडणवीसांच्या भूमिकेबाबत स्पष्टता केली आहे.

देवेद्र फडणवीस हे आज दिल्लीसाठी रवाना होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसरकर यांनी वृत्तवाहिनीवर बोलताना आपली भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध मित्रत्त्वाचे आहेत. मी रात्री १२ वाजताही देवेंद्र फडणवीसांना फोन केला तरी ते माझा फोन घेतात. केवळ भाजपचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाहीत. तर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही अतिशय चांगले आहेत, असे म्हणत आम्ही फडणवीस यांची मदत घेतली तर चुकीचं काय, असा थेट सवाल केसरकर यांनी विचारला आहे.

गुवाहाटीतील आमच्या हॉटेलचा खर्च कोण करतं, या प्रश्नावरुनही त्यांनी भूमिका मांडली. तसेच आम्ही आमदार आहोत, आम्हाला चांगल्या पगारी आहेत. मग आमचा राहण्याचा खर्च आम्ही करू शकत नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तसेच, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठीही आम्ही मुंबईतील फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहत होतो. त्यावेळी, आमच्या राहण्याचा, या हॉटेलिंगचा खर्च कोणी केला, याबाबत कुणीही प्रश्न विचारला नाही, असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: