“जे महाराष्ट्रद्रोही आहेत ज्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत बोलावं लागत” – संजय राऊत

 

मुंबई : संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याच भाषेचा वापर करुन संजय राऊतांना उत्तर दिलं आहे. संजय राऊतांना आता चौकशी होणार कळल्यामुळे ते सैरभैर झालेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर टीका केली. आता पाटलांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे कुटुंबासोबत आहे तसेच चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. तसेच त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा त्यांचा पक्ष दिवसागणिक झिजतो आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा बदलली आहे असं मुळीच वाटत नाही. जे महाराष्ट्रद्रोही आहे, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्र विषयी द्वेष आहे अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहे. अशा नरा मोजूनी मारव्या पैजा हजार…मारावी हजार आणि मोजावी एक… त्यांची काय पूजा करावी… त्यांची का मिरवणूक काढावी… जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे.

Team Global News Marathi: