“मी जिंकलोय याची आजच खात्री देतो, संध्याकाळी मुलाखत देईन” – भाई जगताप

 

मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी निवडणूक होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचे सरकार आमनेसामने आले आहे. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपच्या 5 उमेदवारांचा समावेश असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाऊ जगताप हे शेवटच्या जागेसाठी आमनेसामने आहेत. अशात मी जिंकलोय याची आजच खात्री देतो, संध्याकाळी मुलाखत देईन, अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली आहे. राज्यसभेवेळी ज्या चुका झाल्या त्या यावेळी होऊ देणार नाही, असंही भाई जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

या निवडणुकीत काँग्रेसकडून भाई जगताप तर भाजपकडून प्रसाद लाड हे अनुक्रमके शेवटच्या स्थानी आहेत. त्यामुळे आता 10 व्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कारण शेवटचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दोघांकडे पुरेसं संख्याबळ नाहीये

दरम्यान, 10 जून रोजी महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यात शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव करत भाजपने आपल्या माजी मित्रपक्षाचा पराभव केला. भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आणि पक्षाने तीन जागा जिंकून युतीच्या हातून पोपटपंची उडवली. लहान पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा मिळवून फडणवीस यांनी युतीचा खेळ बिघडवला होता. त्यामुळे आज काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Team Global News Marathi: