‘मी मुख्यमंत्री व्हावे असं प्रत्येकाला वाटत’, गिरीष महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला

 

एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तसेच प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे असं सांगत गिरीश महाजन यांनी अजित पवार आणि एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले असून यावर मंत्री गिरीष महाजन यांनी अजित पवार, एकनाथ खडसे यांना खास शैलीत चिमटा घेतला आहे.

महाजन म्हणाले की, प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे, अजित पवार यांनाही वाटत असेल, एकनाथ खडसे यांचे ही बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून लागले होते त्यांनाही वाटत होते, मी सुद्धा मुख्यमंत्री होईल, असा टोला गिरीश महाजन यांनी पवार खडसे यांना लगावला आहे खरी शिवसेना कोणाची? यावर विविध चर्चा होत असताना खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

महाजन यांनी म्हटलं आहे की, शिंदे यांच्याकडे 40 आमदार आणि 12 ते 13 खासदार असून महानगरपालिका, नगरपालिका त्यांच्याकडे असून उद्धव ठाकरे यांनी कितीही फॉर्म भरून दिले. त्यात काही फायदा नसून खरी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी घाबरण्याची काय गरज आहे? एकदा चौकशी होऊन जाऊ द्या झोटिंग समितीचा अहवाल आहे. त्यांचीही चौकशी होऊन जाऊ द्या मी नागपुरातील अधिवेशनात सरकारला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे. झोटींगचा ही अहवाल समोर येऊ द्या, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: