….मग नोटांवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हवा – सुषमा अंधारे

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्याची मागणी केली आहे. यावर ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नोटांवर फोटोच छापायचे असतील तर ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. अर्थक्रांतीचा सखोल अभ्यास केला, त्यांचा फोटो हवा, असे मत अंधारे यांनी व्यक्त केले.

केजरीवाल हे हिंदुविरोधी नेता म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी केलेल्या मागणीमुळे विविध राज्यांमधून यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ही मांडणी धार्मिक अंगाने घेऊ नये. चलनी नोटांवर नावंच टाकायची असतील तर ज्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज सारखा ग्रंथ लिहिला.

तसेच दोन वर्षांपूर्वी नोटबंदीसारखा निर्णय आत्ता घेतला, पण ज्यांनी याची मांडणी अनेक वर्षांपूर्वी केली. ज्यांच्या थेसिसमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. या सर्व अर्थक्रांतीचा अभ्यास केला, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो चलनी नोटांवर असणे हे मला जास्त योग्य वाटते, असे अंधारे म्हणाल्या.

गांधीजींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो हवा. पण यावरून वादंगही होऊ नये. अरविंद केजरीवाल यांनी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो नोटांवर हवा, ही मागणी करणं, यात त्यांना या देवतांमध्ये फार स्वारस्य आहे, असे मला वाटत नाही. पण फक्त चर्चेचा मुद्दा बनवण्यासाठी त्यांनी मागणी केली असावी, असेही अंधारे म्हणाल्या.

Team Global News Marathi: