सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. त्यामुळ पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा विमोचन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे हजेरी लावली. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ पुस्तक विमोचन सोहळ्याला हजर राहू शकलो नाही याबद्दल थोडं दुःख आहे. मुख्यमंत्र्याला आळशीपणा परवडणारा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्वत: बद्दलच टीप्पणी केली.
‘सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ आंबेडकर आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.