माझ्याकडे आलेली यादी संशयास्पद, नव्या गटनेत्याला मान्यता देता येणार नाही

 

कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी झाल्यानंतर आपणच गटनेता असल्याचा दावा केला होता. त्यावर नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात आता नवीन पैलू समोर आला आहे.

शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. तर प्रपोजपदी सुनील प्रभू कायम आहेत. दरम्यान शिंदे यांच्या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेना पक्षाचे प्रत्येक म्हणून भरत गोगावले यांचे नाव सुचवले आहे त्यांच्यासोबत 34 आमदारांची यादी पाठवली आहे.

मात्र ही यादी संशयास्पद असल्याचे सांगत नरहरी जिरवा यांनी भरत गोगावले यांच्या प्रकट नियुक्तीला मान्यता दिलेली नाही. या यादीत काही अपक्ष आमदार आहेत तर या यादीतील एक आमदार नितीन देशमुख यांनी आपली सही नाही असा दावा केला आहे. त्यांनी प्रत्यक्ष येऊन हा दावा केल्यामुळे यादी वरच आता संशय निर्माण झाला आ.हे त्यामुळे ही यादी आपण मान्य करणार नाही, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे.

Team Global News Marathi: