माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला पाहिजे

 

शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सध्या धक्क्यांवर धक्के बसत आहेत. ३९ आमदारांनी साथ सोडल्यानंतर आता खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी १८ पैकी १२ खासदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. मात्र खासदारांनी वेगळा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरे यांना मोठ्या धक्क्याला सामोरी जावं लागेल. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

भुजबळ म्हणाले कि, नवीन सरकार आलेला आहे. नवीन काय होत असेल तर आम्ही वाईट बोलणार नाही. अनेक गोष्टी न्यायलायात आहेत त्यामुळे न्यायालयाचा निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. नाशिक जिल्ह्यात नियोजन समिती अंतर्गत वाटप केलेला निधी सगळ्यांना समान केला होता. आता ते रद्द करण्यात आला आहे त्यामुळे नवीन पालकमंत्री आल्यावर निर्णय होईल. मी शिवसेना पक्षात सुरवातीपासून आहे. माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला पाहिजे. ते त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्यावर ते एकत्र बसून निर्णय घेतली.

दरम्यान, मी आज माझ्या मतदार संघात आलोय. महाराष्ट्रात पाऊस सुरू असला तरी नाशिक मध्ये अजून पाऊस आलेला नाही. जिल्ह्यात फक्त 150 मिलीमीटर पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पेरण्या झाले आहेत मात्र पाऊस नाही. नाशिकच्या गंगापूर धरणात फक्त 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या देखील वाढत आहे. मंत्री नसल्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले

Team Global News Marathi: