बाबा चमत्कारी म्हणत मनसेने लगावला संजय राऊतांना लगावला जोरदार टोला

 

शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्तास्थापना केली. ठाण्यात एकहाती वर्चस्व असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आता त्यांनी शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना बुधवारी संध्याकाळी ठाणे पालिकेतील तब्बल ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक ठाकरे गटात आहे. याच मुद्द्यावरून मनसेने संजय राऊत यांना चमत्कार बाबा म्हणत टोला लगावला.

शिवसेनेतून बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिंदे गटातील आमदारांना परत बोलवत असताना संजय राऊत मात्र आक्रमक विधाने करत सुटले होते. त्यामुळे अखेर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर संजय राऊत यांनी राज्यात ठिकठिकाणी दौरे सुरू केले. पण याच दरम्यान ठाणे महापालिकेत शिवसेनेला प्रचंड मोठं भगदाड पडलं आहे.

ठाणे सह अनेक महानगर पालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना ६६ नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. राऊत यांच्या विधानांमुळेच शिवसैनिक पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याची चर्चा आहे. तशातच मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना डिवचले. “चमत्कार बाबा’ संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख… सौ दाऊद, एक राऊत…”, असे खोचक ट्वीट त्यांनी केले.

 

Team Global News Marathi: