‘माझ्या बापाला कुणी मारलं, मला माहित आहे पण…’, जागर यात्रेत पूनम महाजनांचा आरोप

 

माझ्या बापाला कुणी मारले, मला माहित आहे पण त्या मागील मास्टरमाइंड कोण होते? तेव्हा तुम्ही सत्तेत होतात, असा आरोप खासदार पूनम महाजन यांनी केला आहे. त्या मुंबईत भाजपच्या जागर मुंबईचा या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, तुम्ही जर 50-50 चा फॉर्मुला वापरत होतात तर मुंबईमध्ये भाजपला महापौरपद पहिल्यांदा का दिलं नाही?
खासदार पूनम महाजन यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन उद्धवजींच्या शिवसेनेने राजकारण केले. आज वांद्रे पूर्व येथून जागर मुंबईचा अभियानाची पहिली सभा होत आहे. हा जागर कशासाठी हे सांगताना पूनम महाजन म्हणाल्या की, मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी, सरंक्षण खात्याच्या, रेल्वेच्या, विमानतळाच्या, सरकारी वसाहतीमध्ये, फनल झोनमध्ये अडकलेल्या, रखडलेल्या एसआरए प्रकल्पामधील सर्व रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी हा जागर होत आहे.

हा जागर कशासाठी तर ट्राफिकची समस्या सोडविण्यासाठी. तसेच अद्ययावत हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र उभारण्यासाठी हा जागर होत असल्याची भूमिका त्यांनी मांडला. आश्वासन नाही तर आता निर्णय होणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या सभेला खासदार पूनम महाजन यांनी ही सभेला संबोधित करताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

मराठी- गुजराती असा वाद निर्माण करताय? पण तुम्हाला याचा विसर का पडलाय की गुजरातचा भाजपाचे अध्यक्ष मराठी आहेत. गुजरात मध्ये मराठी माणस हा झेंडा फडकवला त्याचा तुम्हाला अभिमान नाही का? मुंबईतील हा जागर अनेक प्रश्न विचारणार आहेच पण न सुटलेल्या मुंबईकरांच्या प्रश्नांचा जाब ही विचारणार आहे , असेही खासदार पुनम महाजन यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: