माझी भूमिका मी जाहीर करणार नाही, तर…. असं का म्हणाले बच्चू कडू

 

अमरावती | ‘मै झुकेंगा नही’ हे बॅनर म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. आम्ही 20 वर्ष दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणं आंदोलन केली. जर कोणी येऊन असे आरोप करत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होतात असेही बच्चू कडू म्हणाले. आज आमची भूमिका जिल्हा प्रमुख यांच्याशी बैठक करुन जाहीर करणार आहे. माझी भूमिका मी जाहीर करणार नाही तर एक दिव्यांग व्यक्ती जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

आज होणाऱ्या बैठकीबाबत एबीपी माझानं बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी आज 11 वाजता आमच्या जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. यामध्ये काही दिव्यांग बांधव देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. ही बैठक झाल्यानंतर एक दिव्यांग बांधव पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

आजच्या मेळाव्याची जी काही तयारी केली आहे ती कार्यकर्त्यांनी केली आहे. 20 ते 25 वर्ष मेहनत करुन संघटन उभं केलं आहे. हे संघटन सहज उभं राहत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट लागत असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, मै झुकेंगा नही’ हे बॅनर कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा जो लढा आहे, तो लढण्यासाठी कोणासमोर झुकण्याची काही कारण नाही. काही लोकांना वाटते की सत्तेसमोर आम्ही झुकू. पैशासमोर झुकू. पण पैसा, पद आणि सत्ता याच्यासमोर आम्ही झुकणार नसल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

Team Global News Marathi: