माझी बायको आणि सून महाराष्ट्रीयन, घरात मराठीच बोलतात, मला मराठी भाषेचा अभिमान

 

मुंबई : राज्यात आघाडीचे सराज झथपं झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीच्या अनेक नेत्यांच्या अडचणी वाढवल्या होत्या अशातच मराठी मुद्द्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना सोमय्या यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे माझी बायको आणि सून महाराष्ट्रीयन, घरात मराठीच बोलतात, मला मराठी भाषेचा अभिमान आहे असे विधान माध्यमाशी बोलताना केले होते.

P

काही दिवसांपासून राज्यात भाजप विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याघरी ईडीने छापेमारी केल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, किरीट सोमय्यांनी ही आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर, आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानेही किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘माझी पत्नी प्राध्यापिका आहे. माझी सुनबाई मराठी आहे. त्यामुळं कदाचित त्यांच्यापेक्षा माझं मराठी चांगलं आहे. मराठी भाषा समृद्ध आहे. ही फक्त भाषेची समृद्धी नाही म्हणणार. माझा, माझ्या वडिलांचा आणि मुलाचा जन्म इथेच झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्र आणि राज्याचा आम्हाला अभिमान आहे,’ असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: