मुंबई | मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती पाहण्यासाठी सोमवार रोजी महापौर किशोरी पेडणेकर पहाटेच घराबाहेर पडल्या. यावेळी त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्वे होते याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार टीका केली होती. आता त्या पाठोपाठ दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुद्धा महापौर पेडणेकर यांना जोरदार टोला लगावला आहे. काय काय करतात आपल्यासाठी हे. आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो…’, असे लिहित त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे .
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यातच मुंबईतल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती पाहण्यासाठी सोमवार रोजी महापौर किशोरी पेडणेकर पहाटेच घराबाहेर पडल्या. त्यांच्यासोबत काही वॉर्ड अधिकारीही होते. महापौर सरळ पोहचल्या चेंबरच्या रस्त्यांवर. तिथं मनपा अधिकारी आधीच हजर होते. महापौरांनी या रस्त्याची पाहणी केली, आणि एका ठिकाणी जास्त खड्डे दिसल्याने महापौर संतापल्या. त्यांनी थेट अधिकाऱ्याची फाईल फेकण्याचा प्रयत्न केला आणि सध्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले होते.
तसेच यावर आमदार निलेश राणे यांनी सुद्धा जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की, आम्ही मराठी सिनेसृष्टीत हा व्हिडीओ पाठवणार आहोत, जेणेकरून 2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड हा आमच्या महापौर मॅडम ना मिळालाच पाहिजे. इतकी सहज एक्टिंग करणे अशक्य आहे, दिग्गज कलाकारांना सुद्धा अशी एक्टिंग जमणार नाही. एकूणच, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या पाहणी अभियानाला निलेश राणेंनी पाहणी अभिनय ठरवलं आणि त्यांना अभिनयाचा अवॉर्ड देण्याची मागणी केली.
काय काय करतात आपल्यासाठी हे. आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो. #Sarcasm https://t.co/7dy9hy5jJq
— Kedar Shinde (@mekedarshinde) September 28, 2021