मातोश्री दाऊद धमकी प्रकरण, मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा ;सुरक्षा वाढवली

मातोश्री दाऊद धमकी प्रकरण, मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बांद्रा स्थित असलेले मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी दुबईवरून आलेल्या फोनवरून देण्यात आली होती. सदर बोलणारा व्यक्ती कुख्यात अंडरवर्ल्ड दोन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असल्याची माहिती समोर येत आहे. सदर प्रकरण घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा अधिक कडेकोट केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान उडवून देण्याच्या मिळालेल्या धमकीवर काल मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जातीने लक्ष घालून गुन्हे शाखेला कसून तपास करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती समोर येत आहे.

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा अली. याबैठकीत यावर चिंता व्यक्त करत सदर कृतीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. हे प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने तातडीने यात लक्ष घालून यामागे जे कोणी असतील त्यांना शोधून कठोर शासन करावे अशी भावना मंत्रिमंडळात सर्वांनी बोलून दाखवली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: