मोठी बातमी | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने बजावली नोटीस

 

शिसवेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ३५८ आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे अशातच आता आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोट यांच्या मालिकेनंतर आता सतत स्थापनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तर याप्रकरणावर संजय राऊतांनी थेट बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे अशातच आता संजय राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने नोटीस बजावली आहे.

जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठलं आहे. उद्या 28 जून रोजी त्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. राऊतांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. आधीच शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाविकास आगाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. हे असताना संजय राऊतांना मोठा ईडीचा मोठा झटका बसल्याचं बोललं जातं आहे.

काय आहे प्रकरण ?

2006 मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प 2008 मध्ये सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला 1 हजार 34 कोटींना फसवले होते. बिल्डरने विक्रीचे क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप आहे. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे.

वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

Team Global News Marathi: