मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणाल्या….

 

नवी दिल्ली : राज्यातील कोरोनाचे निर्बध हटविण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य मंत्री मंडळाने घेतला. या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी विरोध केलाय.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोरोनाचं संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे मास्कचा वापर करावा लागेल, असं म्हटलंय. मास्क वापरण्याच्या सूचना या केंद्राने दिल्या आहेत. केंद्र सरकारने मास्क बंदी केली नाही. दिल्ली सरकारनंही मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. राज्य सरकारनं मास्क बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी कोणता रिसर्च केला? असा टोलाही त्यांनी राज्यसरकारला लगावला आहे

Team Global News Marathi: