“मार्शल लावून विरोधकांना आवाराच्या बाहेर काढा” भास्कर जाधव संतापले |

 

मुंबई |  विधिमंडळ अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाने आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली होती. वीरोहकांच्या या कृतीवरून विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. विधान भवन परिसरात कुठल्याही संविधानिक कामकाजाशिवाय इतर कामकाज होऊ शकत नाही. विरोधी पक्षांचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु स्पीकर लावून भाषणबाजी करणं यासाठी विधानभवन परिसराचा राजकीय वापर केला जातोय असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

भास्कर जाधव यांच्या आक्षेपानंतर राष्ट्रवादीचे राष्टीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही अशाप्रकारे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर स्पीकर लावून आंदोलन करणे योग्य नाही. तात्काळ हे स्पीकर जप्त करण्यात यावे अशी मागणी केली. इतकचं नाही तर मंत्री जयंत पाटील यांनी ज्या ज्या सदस्यांनी माईकचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

विधिमंडळ पायऱ्यांवर प्रतिविधानसभा सुरू आहे. माईक सुरू आहे. जर हे बंद होणार नसेल तर तर आपलं सभागृह थांबवूया. ताबडतोब हा प्रकार थांबवला पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानंतर तालिका अध्यक्षपदी भास्कर जाधव पुन्हा बसले. तेव्हा तातडीने स्पीकर जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

Team Global News Marathi: