मराठवाड्यामध्ये शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे – संजय राऊत

औरंगाबाद : पुनः एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर औरंगाबाद येथील सभेतून निशाणा साधला आहे काहीजण औरंगाबादमध्ये आले आणि गेले, पण मराठवाड्यामध्ये शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपला लगावला आहे.

 

औरंगाबामध्ये उसळळेली लाट ही दिल्लीच्या तख्ताला हादरा दिल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

संजय राऊत म्हणाले की, “देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्याची झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. मोदी शाहंना या झळा बोलत नाहीत. महागाईवर बोललं तर ते ज्ञानवापी मशिदीवर बोलतात. पण कैलासवरील शिवलिंग चीनच्या ताब्यात आहे, ते त्यांनी परत मिळवावं. पण ते यावर बोलणार नाहीत.”

Team Global News Marathi: