नाव बदलायला आता बदलू शकतो, पण… नामांतरावर काय म्हणाले उद्धव ठाकरे

 

औरंगाबाद : पुन्हा एकदा औरंगाबाद येथील जाहीर सभेटुम शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे . आज पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे पाणीप्रश्नाला मी सामोर जातोय, कुठेही फसवेगिरी नाही. मी प्रामाणिक आहे. पूर्वी दहा दिवसांपूर्वी पाणी यायचं आता हे दिवस कमी कमी होत चालले आहेत. सभेला येताना प्रशासकीय अधिकारी भेटले.

झारीतले शुक्राचार्य त्यांना बाहेर फेका आणि माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या असं अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. पाणी योजनेसाठी मी पैसे देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने देणार आहे. योजनेसाठी पैसे कमी पडून देणार नाही. परंतु योजनेला विलंब झाला तर दया, माया न दाखवता कंत्राटदाराला तुरुंगात टाका असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं आहे. पूर्वीप्रमाणे आजही मैदानाचा कोपरा भरलेला आहे. तोच जल्लोष, उत्साह आहे. जागा नाहीत, मैदान पुरत नाही इतकी आपली ताकद वाढत चालली आहे. तुमच्या रुपाने आई तुळजाभवानीचं दर्शन घेतोय. देवसुद्धा आपली सभा कशी बघत असेल असं दृश्य मी पाहिले. ढेकणं चिरडण्यासाठी तोफेची गरज लागत नाही. त्यासाठी आपली शक्ती वाया घालवायची नाही. हिंदुत्व हा आपला श्वास आहे असं त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: