मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा कार दुर्घटनेत मृत्यू |

 

मुंबई | मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ही दुर्घटना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बार्देज तालुक्यातील हडफडे गावाजवळ हा अपघात घडला. ईश्वरी देशपांडेसोबतच तिचा मित्र शुभ देगडे याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मराठाच्या चीन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बागा या भागातील एका खाडीत गाडी पडल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना ईश्वरी आणि शुभम या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. ज्या कारने हे दोघे जात होते, त्या कारचा वेग खूप जास्त होता असं सांगण्यात येत आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने ती खाडीत पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मात्र सदर गाडी कोण चालवत होतं, हे मात्र कळू शकलेलं नाहीये. १५ सप्टेंबरला हे दोघे सुट्टीसाठी गोव्याला आले होते. पुढच्या महिन्यात या दोघांचा साखरपुडा होणार होता असंही सांगितलं जात आहे. ईश्वरी देशपांडे प्रेमाचे साईड इफेक्ट या चित्रपटात झळकणार होती.

Team Global News Marathi: