अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक, आमदार योगेश कदम यांची ग्वाही

 

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे, तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम यांनी प्रशासकीय अधिकारी आणि शिवसेना तसेच युवासेनेच्या कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांचे आपल्या आधाराने मनोधर्य वाढवा अशा सुचना दिल्या आहेत.

आमदार कदम म्हणाले की, अतिवृष्टीने खेड शहरातील नागरिकांसह तालूक्यातील रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मनोधर्य वाढविणे गरजेचे आहे. संकटात सापडलेल्यांना उमेदीसाठी आपलेपणाचा आधार दिला गेला पाहीजे. तरच लोक या परिस्थितीतून सावरतील. मदतीचा हात देतानाच त्यांच्या मनालाही आपलेपणाचा आधार शिवसैनिकांसह स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निर्माण करावा, असे ते म्हणाले.

खेड तालुक्यात अतिवृष्टीने आलेल्या पूराच्या पाण्याने नागरी वस्तीत प्रचंड नुकसान केले. काही ठिकाणी दरडी कोसळल्या. पूराच्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून गेले. विविध ठिकाणच्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत. या संकटातून बाहेर येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्याचप्रमाणे आमदार या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून आपणही अन्नधान्य, कपडे, ब्लँकेट, पाणी आदी वस्तू तसेच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेकडून पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कदम यांनी सांगितले.

Team Global News Marathi: