उस्मानाबाद : राज्याची पहिली सिंहावलोकन बैठक उस्मानाबाद येथे पार पडली. एक दिशा’ ‘एक भाषा – एक धोरण’ तेच ‘तोरण” मराठ्यांचा “एकसूत्री” कार्यक्रम, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले. उस्मानाबादयेथील समर्थ मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे पार पडली.
या बैठकीला अखिल भारतीय छावा चे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, मराठा महासंग्राम संस्थापक राजकुमार सूर्यवंशी, स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉ कृषीराज टकले, मराठा आरक्षण विषयाचे अभ्यासक कायदेतज्ञ अॅड. राजेश टेकाळे, अॅड. आशिष गायकवाड, अॅड. रमेश दुबे तसेच या बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील काही कारणास्तव येऊ शकले नाहीत परंतु त्यांनि फोन कॉल वरून माईक स्पीकर वरून फोनवर बैठकीला संभोधित केले.
मराठा सेवा संघाचे माजी प्रदेश अध्यक्ष नेताजी गोरे, शिवधर्म फौंडेशन संस्थापक दीपक काटे, स्वराज्य सेनेचे संस्थापक संजय वाडकर, अॅड. विशाल कदम, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील, मराठा उद्योजक परिषदेचे भागचंद झंlजे, मराठा शेतकरी संघटनेचे संस्थापक सुभाष गागरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष तानाजी चौधरी, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गरड, मनीषा ताई राखुंडे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी आंदोलनाची एकच दिशा असावी आणि आत्तापर्यंत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी,जातीय सलोखा राखून आणि राजकीय हस्तक्षेप टाळून केंद्र आणि राज्य सरकार दोघांवर सोबतच दबाव आणण्यासाठी आंदोलनावर चर्चा करण्यात आली.या बैठकीला काही प्रतिनिधी येऊ शकले नाहीत म्हणून एकसूत्री भूमिका घेण्यासाठी ही एकच बैठक पुरेशी नाही.
सिंहावलोकन बैठकीला व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूप देऊन सर्वांना सहभागी करून घेऊन संबंध महाराष्ट्रासाठी एकच दिशा एकच भाषा एकच धोरण आणि तेच तोरण आणि मराठ्यांचा असा हा एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यासाठी सर्व समन्वयक सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना मराठा आरक्षण आंदोलनाची राज्याची एकसूत्री भूमिका ही 17 ऑक्टोबर ला पुण्यातून ठरवली जाईल असे आवाहन सर्वांच्या वतीने, एकमताने करण्यात आले.
एक राजा बिनडोक, तर दुसरा…, प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही राजांवर निशाणा
या सिंहावलोकन बैठकीचे निमंत्रक हे मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आणि आयोजक सकल मराठा समाज उस्मानाबाद चे संकेत सूर्यवंशी, विशाल लोमटे, वैभव मोरे, प्रीतम मुंडे, आकाश मुंडे, अक्षय नाईकवाडे, अमोल सिरसट, संकेत हरवले यांनी केले होते.