मराठा तर इतिहास रचतो… उद्धव ठाकरेंनी केलं नीरज चोप्राचं कौतुक

महाराष्ट्राशी नाळ जोडलेल्या नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राचे कौतुक खास शब्दांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ठाकरे यांनी नीरजच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटले की, ” मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो.” ठाकरे यांनी यावेळी नीरजच्या कामगिरीचे कौतुक तर केलेच, पण त्याचा भव्य सत्कार महाराष्ट्रात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मुंबईत त्याचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

नीरज चोप्रा हा १३ ऑगस्टला आपल्या हरयाणातील खांदरा या गावात येणार आहे. यावेळी नीरजचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर नीरज १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाणार असल्याचे समजते आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याचा सत्कार करु इच्छित आहे, असे ठाकरे यांनी नीरजच्या कुटुंबियांना सांगितले आहे. नीरजच्या कुटुंबीयांनी यावेळी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला माहिती देताना ही गोष्ट सांगितली आहे.

नीरजचे पूर्वज महाराष्ट्रातील

नीरज चोप्रा यांचे पूर्वजही महाराष्ट्रातील आहेत. रोड मराठ्यांच्या नावांचा अपभ्रंश होऊन उत्तर भारतातील आडनावांशी साधर्म्य ठेवणारे आहे. मात्र, नीरज यांचे वडील रोड मराठा असल्याचे सांगतात.

तसेच त्याने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण रोड मराठा आहोत आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे असे सांगितले होते.

काही शतकांपूर्वी पानिपतच्या लढाईत त्यांच्या पूर्वजांनी तलवार हातात घेऊन पानिपतावर कर्तबगारी गाजवली.

आज त्याच मातीत नीरजने भाला हातात घेऊन भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली.नीरजचे कुटुंबचा व्यवसाय शेतीच आहे. २०१५ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नवा विक्रम नोंदविल्यापासून प्रत्येक मुलाखतीत तो रोड मराठा समाज व कुटुंबांच्या शेती व्यवसायाचा आवर्जून गौरवाने उल्लेख करीत आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: