महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये- उद्धव ठाकरे

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी विरोधकांनी मंदिरे आणि लोकल सेवा सुरु करण्याच्या मागणीवरून सुरु केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगलाच आपल्या शब्दात समाचार घेतला आहे.

हे उघडा ते उघडा काही जण म्हणत आहे. महाराष्ट्रातील काही घटक लोकांची माथी भडकावत आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनं अशा उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेचमहाराष्ट्र मॉडेलचं कौतुक होत आहे हे आमचं कौतुक नाहीतर जनतेचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

दुकानं खुली ठेवावी अशी मागणी होत आहे. मी तर म्हणतो २४ तास दुकानं उघडी ठेवूया, पण कामाच्या वेळेत बदल करावा लागणार आहे. जिथे गर्दी वाढली तिथे रुग्ण वाढले आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिर खुली करण्यासाठी ८ दिवस लागणार आहे. कोरोना गेला आहे, तर दुकानं उघडा, अशी मागणी करत आहेत. लोकांचा संयम सुटत चालला आहे पण संयम ठेवावा लागणारे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

Team Global News Marathi: