मंत्री बच्चू कडूंवर दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट !

 

प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल होण्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. 11 मार्च रोजी अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी राज्यपालांना दिलेल्या अहवालात पालकमंत्री बच्चू कडूंवर गुन्हे दाखल करण्याइतपत पुरावे नसल्याचं नमूद केलं होतं.

पालकमंत्र्यांनी पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड केली नसल्याचं अहवालात स्पष्ट केलं होतं. हाच पोलीस अधिक्षकांचा अहवाल ‘एबीपी माझा’च्या हाती लागला आहे. या अहवालातून हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर पोलीस अधिक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण तपासासाठी वर्ग केलं होतं.

वंचितनं बहुजन आघाडीनं बच्चू कडूंवर रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं या अहवालात नमूद केलं होतं. त्यामुळे आता हा अहवाल देणाऱ्या अकोला पोलिसांनीच बच्चू कडूंवर गुन्हे दाखल करताना तत्परता का दाखवली?, असा सवाल उपस्थित होत आहे. अकोला न्यायालयाच्या आदेशावरून पालकमंत्री बच्चू कडूंवर काल सिटी कोतवाली पोलिसांत विविध पाच कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

Team Global News Marathi: