महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या, चंद्रकांत पाटलांचा टोला

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहे अशातच राऊतांच्या सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडेतो प्रतिउत्तर दिले आहे. माझ्या वक्तव्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार चेष्टा केली जाते. मात्र, सगळी चेष्टा त्यांच्या अंगलट येणार असून, मी जे म्हणत गेलो तेच होत गेले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, जे जात्यात होते त्यांचे पीठ झाले आणि जे सुपात होते ते आता जात्यात जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो, असा सूचक इशारा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. त्यांच्या या विधानामुळे पुढचा नंबर कोणाचा याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना पदाधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ईडीला सापडलेल्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ला २ कोटी व ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे. कोणाच्या घरी काय सापडले, त्यात काय आहे हे मला माहिती नाही. मात्र, खूप काहीतरी होणार आहे, असे दिसते असं सूचक विधान त्यांनी केले होते.

Team Global News Marathi: