मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले होते पत्र, त्यात केले धक्कादायक खुलासे

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानाच्या बाहेर स्कॉर्पिओ आढळलेल्या स्फोटकामुळे खळबळ उडाली होती. सध्या मनसुख यांचा मृत्यू हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी मनसुख यांच्या मालकीची असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती.

मनसुख हिरने यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवले आहे या मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे नमूद केले होते.

पत्रात हिरने लिहितात की, या घटनेनंतर मला विक्रोळी पोलीस ठाणे तसेच नागपाडा एटीएस यांच्याकडून सतत चौकशीसाठी फोन आले. त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. यादरम्यान बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत.

एका पत्रकाराने फोन करुन या प्रकरणात मी संशयित असल्याचे सांगितले. या सततच्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं. माझी आणि माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी पत्रातून केली.

Team Global News Marathi: