मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भराडी देवीच्या चरणी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी साकडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भराडी देवीला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केली आहे. सध्या आंगणेवाडी यात्रेवर सुद्धा कोरोनाचे संकट उभे थाटले आहे. त्यामुळे यावेळी यात्रेला कोणीही गर्दी न करण्याचे आव्हान आंगणेवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,कोरोनारुपी राक्षसाचा नाश होऊ दे अशी प्रार्थना भराडीदेवीच्या चरणी त्यांनी केली होती. माझ्या शक्तीचा संपूर्ण उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशीर्वाद भराडी देवीकडे मागतांना मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली होती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापूरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी ता. मालवण तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे ता. कणकवली जि. सिंधुदूर्ग या योजनांचे ऑनलाईन भुमीपुजन केले होते यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तसेच आंगणेवाडीच्या यात्रेला कोरोना संसर्गाच्या काळात गर्दी करू नका असे आव्हानाला प्रतिसाद देत अनेकांनी येणे टाळले होते या सर्व भाविकांचे मुख्यत्र्यांनी आभार मानले आहे.

Team Global News Marathi: