राजकारणात काहीही होऊ शकत नाना पटोले आमच्याकडे येऊ शकतात – रामदास आठवले

सांगली :  मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिव वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु करण्यात यावी अशी मागणी केली होती.

मात्र यावर भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असलेले रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती राजवट लागू न होऊ देण्याची मागणी केली आहे. ते काल सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमकुवत असल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, ‘राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले सुद्धा आमच्या कडे येऊ शकतात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पण टिकू शकणार नाही. कारण त्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, असा दावाही रामदास आठवले यांनी यावेळी केला होता.

तसेच MPSC च्या परीक्षा वेळेवर घेतल्या पाहिजेत, अशी मागणीही रामदास आठवले यांनी यावेळी केली आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ अशी आमची अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले आहेत. राज्यासह संपूर्ण देशातून कोरोना हद्दपार व्हावा, अशी आशा व्यक्त करत आठवले यांनी आता ‘गो कोरोना, नो कोरोना’ अशी नवीन घोषणा दिली आहे.

Team Global News Marathi: