मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट होताच वसंत मोरेंची शेरो शायरी

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाढवा मेळाव्याला केलेल्या का विधावरून मनसेमध्ये दोन गट निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले होते. अशातच राज ठाकरे यांच्या विधानानंतर मात्र त्याच एल्गाराचे साईड इफेक्ट पक्षात उमटू लागले आहेत.पुण्यातल्या काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले आहेत. तर, दुसरीकडे ‘आपण प्रभागात शांतता ठेवण्यास प्राधान्य देणार’ असल्याचे मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितलं होत.

दरम्यान, वसंत मोरेंच्या या भूमिकेनंतर पक्षांतर्गत अनेक चर्चा रंगू लागल्या आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयावर वसंत मोरे काहीसे नाराज असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी पक्षातील नाराजी कमी करण्यासाठी वसंत मोरे यांना खुद्द राज ठाकरेंनीच भेटीचं बोलावणं पाठवलं आहे.

याचदरम्यान आता वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्टनी सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. ‘किसीं की क्या मजाल जो छेडे दिलेर को…गर्दिश में तो घेर लेते हैं गीदड भी शेर को…’, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

Team Global News Marathi: